बंगालमध्ये हिंसाचार सुरूच; शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक

Throwing stones at Shubhendu Adhikari convoy - Maharastra Today

कोलकाता :- पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. बंगालमध्ये ३० तर आसाममध्ये ३९ जागांसाठी मतदान होत आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडल्याचे समोर आले. तृणमूल काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर मतदारांना धमकावल्याचे आरोप केले आहेत. यातच पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघात सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे शुभेंदु अधिकारी यांनी आव्हान दिले आहे. मतदानादरम्यान शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे उमेदवार अशोक डिंडाच्या गाडीवरही दगडफेक झाली. यात डिंडा याला दुखापत झाली. आता मुख्यमंत्र्यांविरोधात उभे असलेल्या उमेदवाराच्या ताफ्यावर दगडफेक होत आहे. पश्चिम बंगालमध्ये जंगराज सुरू असल्याचा आरोप शुभेंदु यांनी केला आहे.

शुभेंदु यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या काचाही फुटल्या आहे. “पाकिस्तानी लोकच असे करू शकतात. ‘जय बांगला’ हे घोषवाक्य बांगलादेशमधून आलेले आहे. एका समूहाच्या जोरावर विजय मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.” असा आरोप शुभेंदु अधिकारी यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button