बंगालमध्ये हिंसाचार सुरूच; तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून थेट केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला

BJP leader V. Muraleedharan's Convoy Attacked By TMC Goons

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसला (Trinamool Congress) बहुमत मिळाल्याचे पुन्हा दिसून आले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर बंगालमधील विविध भागांत मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. भाजप (BJP) कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले सुरूच आहेच. आता पश्चिम  मिदनापूर  जिल्ह्यातील पंचखुंडी गावात केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन (V. Muraleedharan) यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली.

खुद्द केंद्रीय  राज्यमंत्री व्ही.  मुरलीधरन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये काही लोक त्यांच्या ताफ्यावर हल्ला करताना दिसत आहे. त्यामुळे आपल्याला दौरा मध्येच सोडून परतावं लागल्याचंदेखील व्ही. मुरलीधरन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. व्ही. मुरलीधरन हे पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय टीमचे सदस्य आहेत. ते पश्चिम  मिदनापूरमधील हिंसाचाराने पीडित कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोहचले होते. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांसोबतची बैठक आटोपून ते परत निघाले होते. यामध्ये मुरलीधरन यांच्या गाडीच्याही काचा फुटल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. हा प्रकार घडल्यामुळे अर्ध्या वाटेतून त्यांच्या ताफ्याला माघारी परतावं लागलं. “पश्चिम  मिदनापूरमध्ये तृणमूलच्या गुंडांनी माझ्या ताफ्यावर हल्ला केला.

गाडीच्या काचा फुटल्या. माझ्यासोबतच्या कर्मचाऱ्यांवरदेखील हल्ला झाला. त्यामुळे दौरा आटोपता घेण्यात आला. ” असं या ट्विटमध्ये मुरलीधर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या घटनेचा भाजपने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. निवडणुकीच्या निकालापासूनच टीएमसी पुरस्कृत हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये जोरात सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. जेव्हा हजारो लोक जीव वाचवण्यासाठी पळून जात आहेत, बलात्काराच्या घटना घडत आहेत, तेव्हा फ्रीडम ऑफ स्पीच आणि मानवाधिकारांची वकिली करणारे गायब झाले आहेत. पश्चिम मिदनापूर येथे केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर टीएमसी कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. मी काल सांगितले की, बंगालमधील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. जिथे भारत सरकारच्या मंत्र्यावर हल्ला होतो, तिथे सामान्य लोकांची परिस्थिती काय असेल? असा प्रश्न उपस्थित करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी निषेध व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button