पुन्हा कॉंग्रेस-शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

मुंबई : ताज हॉटेलला रस्त्याची जागा नाममात्र दरात भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचा विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. लोकायुक्तांनी या जागेचा वापर ताजला करण्यास देण्यासाठी महापालिकेला धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. पण प्रशासनाने परस्पर निर्णय घेत एकप्रकारे लोकायुक्तांच्या निर्देशाचे उल्लंघन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी केला. ताज हॉटेलला सुरक्षेच्या मुद्द्यावर रस्ता व पदपथाची जागा नाममात्र दरात देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचा विरोधी पक्षनेते रवी राजा, सपाचे गटनेते आमदार रईस शेख आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत तीव्र निषेध केला.

महापालिका प्रशासनाचे व सत्ताधारी पक्षाचे कंत्राटदार, हॉटेल मालक आणि कंपन्या यांच्याबरोबर साटेलोटे असून, त्यांच्या तिजोऱ्या भरण्याचे काम ही मंडळी करत आहेत. ताज हॉटेलला रस्त्याच्या वापरासाठी २००९ पासून, केवळ ६२ लाख रुपये वसूल केले आहेत तर बाकीचे कोट्यवधी रुपये माफ केले जात आहेत. मात्र, लोकायुक्तांकडे झालेल्या सुनावणीत त्यांनी रस्ता व पदपथाची जागा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. पण, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धोरण न बनवता परस्पर पदपथाची जागा नि:शुल्क आणि रस्त्यासाठी ५० टक्के शुल्क आकारून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रशासनाने ताज हॉटेलसाठी लोकायुक्तांच्या निर्देशाचे अवमूल्यन केल्याचा आरोप रवी राजा यांनी केला. या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.

याला आमचा विरोध आहे आणि राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिमंडळ-१ चे उपायुक्त यांनी या हॉटेलला मदत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोपही राजा यांनी केला. एका बाजूला मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पनाचा महसूल कमी झालेला आहे. दुसरीकडे अशा प्रकारे महापालिकेचा महसूल बुडवून काही व्यक्तींना आणि त्यांच्या कंपन्यांना मदत केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी अशा प्रकारे कुठेच पदपथ चालण्यास बंद करण्यात आलेला नसल्याचे सांगितले. पण त्याचा आधार घेऊन त्यांना पदपथाची जागा देऊन टाकणार का? उद्या मग अशा प्रकारे परदेशी पर्यटक राहायला येणारी हॉटेलही असाच दावा करतील आणि ताजच्या धर्तीवर सुरक्षेच्या नावाखाली रस्ते व पदपथाची जागा देऊन टाकतील.

मग लोकांनी चालायचे कुठून आणि गाड्या चालवायच्या कुठून, असा सवाल त्यांनी केला. सुरक्षेच्या कारणास्तव जर हॉटेलला धोका असेल तर त्यांनी परदेशी पर्यटक बंद करावेत. ग्राहकांकडून लाखो रुपये कमवत नफा कमवणाऱ्या या हॉटेलला, सुरक्षेच्या कारणास्तव पादचाऱ्यांची चालण्याची हक्काची जागा फुकटात देऊन टाकायची हे आम्हाला मान्य नाही. पदपथावर चालण्याचा अधिकार हा नागरिकांचा आहे. त्यामुळे जर ही पदपथं देण्यावर प्रशासन ठाम असेल तर लोकांच्या हरकती व सूचनाही जाणून घ्यायला हव्यात, असे राखी जाधव यांनी सांगितले. सपाचे रईस शेख यांनीही महापालिकेचा महसूल वाढवण्याचा विचार करण्याऐवजी प्रशासन तो कमी करण्यासाठीच अधिक प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER