कोरोना नियमांचे उल्लंघन : नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल

Navneet Rana - Ravi Rana

अमरावती : अमरावती शहरात शिवजयंती कार्यक्रमात मास्क न घालता उपस्थित राहणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, अशा कोरोनाच्या नियमांच्या उल्लंघनासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह १५ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विनाहेल्मेट, विनामास्क प्रवास

शुक्रवारी शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे  पती आमदार रवी राणा हे दोघेही मास्क न लावता दुचाकीने फिरले होते. शिवजयंतीच्या कार्यक्रमातही त्यांनी मास्क लावला नव्हता तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन केले नव्हते. पोलिसांनी राणा दाम्पत्यासह १५ कार्यकर्त्यांवर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कोरोना नियमांचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अमरावतीत लॉकडाऊन

अमरावतीमध्ये आज लॉकडाऊन आहे. बससेवादेखील बंद आहेत. अमरावती हे विभागाचे ठिकाण आहे.  येथे नागपूर, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, औरंगाबादसह इतर जिल्ह्यांसाठी बससेवा सुरू राहतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER