कोरोना नियमाचे उल्लंघन : कारवाईच्या वादात नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांची हाणामारी !

Mayor and Chief Minister clash over action

वाशीम : कोरोनाच्या साथीमुळे कारंजा नगरपालिका हद्दीत जमावबंदी आहे. सायंकाळी ५ ला दुकाने बंद करण्याचा आदेश आहे. या मुदतीनंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर नपचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर कारवाई करत असताना नगराध्यक्ष शेषराव ढोके यांनी त्यांना रोखले. यातून झालेल्या वादात त्या दोघांमध्ये हाणामारी झाली!

घटना १ मार्चची आहे. सायंकाळी ५ वाजेनंतरही दुकाने बंद न करणाऱ्यांवर मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर कारवाई करत होते. मंगरूळपीर रोडनजीकच्या एका पेट्रोलपंपासमोर रसवंती आणि एक हॉटेल उघडे होते. डोल्हारकर त्यांच्यावर कारवाई करत असताना नगराध्यक्ष शेषराव ढोके तिथे आले व ‘श्रीमंतावर कारवाई न करता गरिबांवर कार्यवाही करू नका’, असा आग्रह करू लागलेत. डोल्हारकर यांनी कारवाई सुरूच ठेवली. यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. प्रकरण मुद्द्यावरून गुद्द्यांवर आले; दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली! लोकांनी मध्ये पडून दोघांना शांत केले. याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने प्रकरण जोरदार चर्चेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER