CORONA : मला पोलीस सुरक्षा नको, राज्याला अधिक सुरक्षेची गरज – विनोद तावडे

Min Vinod Tawade Press Conf 2

मुंबई :  कोरोनाच्या विळख्यात आपण सापडू नये यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी यांनी वेलीच खबरदारी घेतली मात्र, काही असंवेदनशिल नागरिकांमुले राज्यात कोरोनाचा अदिक फैलाव झाल्याचे दिसत आहे. अशातच पोलिसांची जबाबदारी अधिक वाढली आहे. राज्यात सध्या अत्यावश्क सेवा वगळता अन्य सर्व बंद ठेवण्याचे शासनाने निर्देेस दिले आहेत. तरीही नागरिक अकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. अशांना लॉकडाऊनचे महत्त्व पटवून देणे ही अधिकची एक जबाबदारी पेलिसांवर वाढली आहे. त्यामुळेच भाजपाचे नेते, माजी मंत्री विनोद तावडे पूढे येत पोलिस सुरक्षा नको असे आयुक्तांना पत्र लिहीले आहे.

कोरोनाचं महाराष्ट्रावर सध्या भीषण संकट आहे. अशा परिस्थितीत जनतेसाठी सरकारने काही आदेश दिले आहेत. जनतेने आदेशाचं उल्लंघन करू नये यासाठी सध्या पोलिस दिवसरात्र मेहनत करत आहेत. पोलिसांवर याचा अधिक ताण आहे. अशा परिस्थितीत मला सध्या पोलिस सुरक्षा नको. माझी पोलिस सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी विनंती करणारं पत्र भाजप नेते विनोद तावडे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना लिहिलं आहे.

कोरोना : “जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं” – रोहित पवार

गेल्या आठवड्याभरापासून राज्यावर आलेल्या संकटाच्या परिस्थितीत पोलिसांवर अतिरिक्त ताण आहे. अशाही काळात नागरिक आपले कर्तव्य विसरून वागत आहेत. अशा वेळी पोलिसांवरचा ताण अधिकच वाढतो आहे. म्हणून मला पोलिस सुरक्षा नको असा निर्णय मी घेतला असल्याचं तावडे यांनी सांगितलं आहे.