राज ठाकरेंविरूध्द विनोद पाटील चढणार न्यायालयाची पायरी

Vinod Patil - Raj Thackeray

औरंगाबाद :- मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केल्याने मनसेचा झेंडा चांगलाच चर्चेचा मुद्दा बनला आहे. याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. मनसेने गुरूवारी (दि. २३) मुंबई येथील अधिवेशनात पक्षाचा नवा झेंडा समाेर आणला.

औरंगाबाद : बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून उचलले लाखो रूपयांचे गोल्ड लोन

मराठा समाजाकडून न्यायालयीन लढाई लढणारे आर. आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी राजमुद्रेचा वापर केला तर कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केला होता. जर मनसेने राजमुद्रेचा वापर केला तर केंद्र, राज्य सरकारसोबतच निवडणूक आयोगाला पत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले होते.

आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर आपण न्यायालयात जाऊ, असा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे. तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनीही राज ठाकरे यांचा निषेध केला असून, राजमुद्रा हे भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे. राजमुद्रेचा राजकीय कारणासाठी वापर करणे योग्य नाही असे दानवे यांनी म्हटले आहे.