आरक्षण रद्द झाले आता सरकारकडे पर्याय काय; विनोद पाटील यांची प्रतिक्रिया

Vinod Patil reaction Maratha reservation canceled

औरंगाबाद : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष मराठा आरक्षणावर (Maratha reservation) लागलेला होता. मात्र, आज मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने (Supreme court) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मुद्द्याभोवती राजकारण फिरत होते. आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मराठा समाजाच्या पदरी अखेर अपयश आले आहे. आमच्यासाठी हा भयानक असा क्षण आहे, याचे पडसाद महाराष्ट्रातील लाखो तरुणांवर होणार आहे, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी दिली.

दरम्यान, न्यायालयाचा निकाल येताच मराठा आरक्षण लढ्यातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “मागच्या वर्षी न्यायालयाने स्पष्ट केले होते, स्थगितीचा संबंध नाही. अंतिम निकाल देऊ. यावेळी प्रकरण वर्ग करणे गरजेचे होते. सरकारची आरक्षण देण्याची इच्छा नव्हती, असे मी म्हणणार नाही. पण सरकारकडे काही युक्तीदेखील नव्हती. आरक्षण रद्द झाले असेल, तर आता सरकारकडे काय पर्याय आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. निवड झालेले विद्यार्थी, शिक्षण प्रवेशाचा प्रश्न आहे. सरकारने विशेषबाब म्हणून विचार करावा. आम्ही संयमानेच हे प्रकरण हाताळू, असं विनोद पाटील म्हणाले.

आज कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केला. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आमच्यासाठी भयानक असा क्षण आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. इंद्रा साहनी प्रकरणाचा फेर विचार करण्याची गरज नाही. महाराष्ट्र आरक्षणाचा रिपोर्टसुद्धा कोर्टाने थांबवला आहे. न्यायमूर्तींनी वेगवेगळी मते दिली. पण, या निकालाचा परिणाम राज्यातील मराठा समाजातील तरुणावर होणार आहे. सविस्तर निकाल हाती आल्यानंतर त्याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.” असे विनोद पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button