विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी?

Vinod patil-Shiv sena

विनोद पाटील यांनी मराठा समाजाच्या बाजूने न्यायालयात आपली भूमिका ठामपणे मांडली होती . शिवाय लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेला पराभवाचा धक्का मिळाला आहे .पूर्वीचे सेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा समाजातील मते फोडल्याने शिवसेनेला हार मानवी लागली . म्हणूनच विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .


मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यासाठी भाजप-शिवसेना युती सरकारने केलेला कायदा मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविलेला आहे .या पार्श्वभूमीवर, मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी आज ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली . या भेटीनंतर न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणारे विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत .

लोकसभा निवडणुकीदरम्यान औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेला पराभवाचा धक्का मिळाला आहे .तो पराभव पूर्वीचे सेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे झाला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू  आहे. इतकेच नाही तर मराठा समाजाची मते जाधव यांनीच फोडली असल्याचे म्हटले जाते . म्हणूनच जाधव यांना शह देण्यासाठी सेनेकडून विनोद पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते, असा अंदाज आहेत.

मराठा आरक्षण मिळवण्यात आणि कोर्टात ती बाजू मांडण्यात पाटील यांची भूमिका   महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. त्यामुळे पाटील मराठा समाजातील मते मिळविण्यात यशस्वी होतील , असे शिवसेनेला वाटते .