नारायण राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका आहे : राऊतांच्या आरोप

मुंबई :- राज्य सरकारने विरोधी पक्ष आणि इतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला . यावरून भाजप नेते नारायण राणेंनी (Narayan Rane) ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) टीकास्त्र सोडले. सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी माझ्या जिवाचे काही बरं-वाईट झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचे राणे म्हणाले.यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणेंना टोला लगावला आहे.

राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार भक्कम आहे तर केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. मात्र कोणतंही सरकार असलं तरी राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

निलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. निलेश राणेला मतदारांनी घरी बसवलं. नितेश राणेकडे चांगले गुण असल्यामुळे तो पुढे जाईल असं वाटत होतं. मात्र त्यांची गुंडप्रवृत्ती त्यांना घरात बसविल्याशिवाय राहणार नाही, असेही राऊत यांनी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : राऊतांचे अज्ञान, मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही : नारायण राणे  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER