‘कोकण सम्राटांनी’ चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली; विनायक राऊतांची राणेंवर टीका

सिंधुदुर्ग: शिवसेना (Shivsena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाजप (BJP) नेते नारायण राणे  (Narayan Rane) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे . ते शनिवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

स्वत:ला कोकणसम्राट म्हणवणाऱ्यांनी चिपी विमानतळाचं कंत्राट आयआरबी कंपनीला देऊन वाट लावली, अशा शब्दांत त्यांनी राणेंवर निशाणा साधला .

चिपी विमानतळाचे काम एमआयडीसीला दिले असते तर शिर्डी विमानतळाप्रमाणे ते एव्हाना पूर्ण झाले असते. मात्र, नारायण राणे यांनी हे कंत्राट आयआरबीला देऊन संपूर्ण प्रकल्पाची वाट लावली. आता मागे लागून ते काम आम्ही पुर्ण करून घेतोय. डिजीसीएच्या सुचनेप्रमाणे धावपट्टीचे काम पूर्ण न झाल्याने या विमानतळाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही.

त्यामुळे आता आम्ही आयआरबी कंपनीला इशारा दिला आहे. काम पूर्ण झालं नाही तर एमआयडीसी चिपी विमानतळ प्रकल्पाचा ताबा घेईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे करताना विमानतळाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button