‘उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द म्हणजेच वचन’ – विनायक राऊत

Uddhav Thackeray-Vinayak Raut.jpg

मुंबई : शिवसेना (Shivsena) कोकणाच्या जनतेमध्ये धूळफेक करत आहे. एकेकाळी नाणार प्रकल्पाला विरोध करणे आता समर्थन देत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शिवसेना श्रीखंड खात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे नातेवाईक निशाण देशमुख यांनी नाणार रिफायनरी (Nanar Refinery) प्रकल्पाच्या बाधित भागात १,४०० एकर जमीन विकत घेतली. तसेच या जमिनीखरेदीमध्ये परप्रांतीय उद्योजकांची गुंतवणूक असल्याचा खळबळजनक आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. त्यावर आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी निलेश राणेंनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत. स्थानिक जनतेच्या आग्रहास्तव नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. नाणारमध्ये रिफायनरी होणार नाही, कारण उद्धव ठाकरेंनी स्थानिक जनतेला दिलेला शब्द म्हणजेच वचन आहे. भाजपचे आउटडेटेड झालेले नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी आज मोठा जावई शोध लावला आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

नाणार रिफायनरीच्या कंपनीच्या संदर्भातील बैठका मंत्रालय आणि वर्षावर होतात, असे बेताल वक्तव्य निलेश राणेंनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याल आम्ही कवडीची किंमत देत नाही. ते अभ्यास करुन बोलत नाहीत, असेही विनायक राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER