राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी पवारांच नेतृत्व मान्य, शिवसेना खासदाराची माहिती

Vinayak Raut on sharad pawar

मुंबई : सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सीमावादावर (Maharashtra and Karnataka Boundary dispute) मोठा वाद निर्माण झाला आहे. सीमेववरील कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक गावांना महाराष्ट्रात सामावून घेण्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. तर दुसरीकडे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी एक इंचही जागा देणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेतला असून, ते लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार असून, त्यांचे नेतृत्व आम्ही मान्य केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद आणि राज्यातील इतर प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या खासदारांच्या प्रतिनिधीमंडळाचे शरद पवार नेतृत्व करतील. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय अधिनियम, २०१८ अंतर्गत मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण पुनर्संचयित करण्याबाबत ते पंतप्रधानांना निवेदन देतील, अशी माहितीही लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांनी दिली.

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण प्रकरणात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईला केंद्र सरकारने मदत करावी असे राऊत म्हणाले. शरद पवार मोदींना भेटण्यासाठी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, जेणेकरुन प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न मिटू शकेल. जोपर्यंत मराठा कोट्याचा प्रश्न आहे त्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करावे अशी विनंती केली आहे जेणेकरुन सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिलेली अंतरिम स्थगिती उठण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER