पवारांच्या भेटीने काहीही साध्य होणार नाही; विनायक मेटेंचा संभाजी राजेंना टोला

Vinayak Mete-Sambhaji Raje-Sharad Pawar

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे (BJP) खासदार संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास १५ मिनिटं चर्चा झाली. तसेच ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती संभाजी राजेंनी माध्यमांना दिली. मात्र या भेटीतून काहीही साध्य होणार नाही, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केले. एकीकडे संभाजीराजे शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हणतात. मात्र, अवघ्या १० मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षण, नोकऱ्या, सारथी या सर्व विषयांवर चर्चा कशी काय होऊ शकते, असा प्रश्नही विनायक मेटे यांनी उपस्थित केला.

ही बातमी पण वाचा:- पुढाकार घेऊन ठाकरे, फडणवीस, राणेंना एकत्र आणा’, संभाजीराजेंची पवारांना विनंती

संभाजीराजे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर विनायक मेटे यांनी ‘टीव्ही-९ मराठी’शी बोलताना सांगितले की, लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकते. मात्र, शरद पवार यांचा मराठा आरक्षणाविषयीचा आजपर्यंतचा दृष्टीकोन पाहता या भेटीतून काहीही साध्य होणार नाही. मराठा आरक्षण, नोकऱ्या आणि सारथी या महत्वाच्या विषयांवरची चर्चा फक्त १० मिनिटांत कशी पूर्ण झाली? पण आता संभाजीराजे चर्चा सकारात्मक झाली, असे सांगत असतील तर पुढे काय होते ते बघू, असा टोलाही मेटे यांनी लगावला. संभाजीराजे छत्रपती हे राजे आहेत. आम्ही प्रजा आहोत. ते कोणालाही भेटू शकतात. आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागृती करत आहोत. आता संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं असतं तर ही वेळच आली नसती, अशी टीका विनायक मेटे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button