मराठा आरक्षण : ठाकरे सरकारला म्हशीसारखे ढुसणी दिल्याशिवाय हलणार नाही; विनायक मेटेंची टीका

Uddhav-thackeray-And-Vinayak-Mete

मुंबई : मराठा आरक्षण (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर राजकारण चांगलेच तापायला लागले आहे. यावर आता विरोधी पक्ष भाजप आणि विविध मराठा संघटनांकडून बैठका घेतल्या जात आहेत. अशा वेळी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Govt) हल्लाबोल केला आहे. हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखे आहे. ढुसणी दिल्याशिवाय हलणार नाही, असा टोला मेटे यांनी ठाकरे सरकारला लगावला.

महाविकास आघाडी सरकार खोटे आहे. जेव्हा आम्ही सांगत होतो की SEBCच्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्या. तेव्हा विद्यार्थ्यांना कोर्टात जा म्हणाले आणि आता मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारला जाग आली आहे. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषय उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण जबाबदार आहेत. आजपर्यंत या सरकारने EWSचेही आरक्षण लागू केले नाही. ‘सारथी’चे विद्यार्थी पीएच.डी. करत आहेत. त्यांना एक दमडीही फेलोशिप मिळाली नाही, असा संताप मेटे यांनी व्यक्त केला.

मराठा समाज रस्त्यावर उतरेल
“येत्या आठवड्यापासून मराठा समाज मुंबईच्या रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन करेल. मोठ्या प्रमाणात समाज रस्त्यावर उतरेल. वणवा पेटणार, सरकारला दाखवून देऊ की मराठा समाजाची ताकद काय आहे.” असेही मेटे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button