मातोश्रीवर मोर्चाला परवानगी नाकारुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळतायत : विनायक मेटे

CM Uddhav Thackeray - Vinayak Mete

मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आता चांगलाच पेटला आहे . यापार्श्वभूमीवर मुंबईत मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) मशाल मार्च आज सायंकाळी 5 वजात मातोश्रीवर धडकणार आहे. मात्र मातोश्रीवर मशाल मोर्चाला परवानगी नाकारुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळत आहेत. मात्र, आज कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीवर मोर्चा जाणारच, असा निर्धार शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी व्यक्त केला आहे.

बाळासाहेबांच्या काळात लोकं मातोश्रीवर गाऱ्हाणं घेऊन जायची. मात्र, आज मुख्यमंत्री मातोश्रीवर कोणी येऊ नये म्हणून बंदोबस्त करतात. सरकारकडून मराठा मोर्चेकऱ्यांना नोटीस पाठवण्याचे षडयंत्र केले जातेय. हा रडीचा डाव असल्याची टीका, विनायक मेटे यांनी केली.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर आज संध्याकाळी मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तवर या मोर्चाला मातोश्रीवर जाण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER