राष्ट्रवादीकडे महत्त्वाची खाती असतानाही शरद पवार मराठा आरक्षणावर मार्ग काढत नाहीत : विनायक मेटे

Vinayak Mete-Sharad Pawar

मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर गृह खात्यापाठोपाठ आरोग्य खात्यानेही भरती काढली आहे. ही दोन्ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत आणि तेच भरती काढत आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) मात्र आरक्षणावर मार्ग काढायचा आहे असे म्हणतात; पण त्यावर मार्ग काढत नाहीत. याबाबत त्यांना मी अनेकदा बोललो आहे.

ते राज्यातील छोटे-छोटे प्रश्न सोडवतात.  मग हा आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाहीत, असा सवाल शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे ( Vinayak Mete) यांनी केला आहे .राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे . या पार्श्वभूमीवर ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी राज्य सरकारची अवस्था आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मराठा आरक्षणाबाबत योग्य दिशा ठरविण्यासाठी आणि मराठ्यांची एकी वाढवण्यासाठी येत्या ३ ऑक्टोबरला पुण्यात मराठा विचारमंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मेटे यांनी या बैठकीचे निमंत्रण छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. ओबीसी आणि मराठा समाजात काही नेते मंडळी तेढ निर्माण होतील असे वक्तव्य करत आहेत. यामध्ये मंत्री विजय वडेट्टीवार हेच पुढाकार घेत आहेत. वडेट्टीवारांसारखी मंडळी राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचे काम करत असल्याचा आरोप मेटे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER