घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी येणार कळवताच कोर्लईत गावबंदी! सोमय्यांचा आरोप

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या अलिबागमधील कोर्लई गावातील बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी जाणार होतो. तसे प्रशासनाला कळवलंही होतं. पण मी येणार म्हणताच कोर्लई गावात गावबंदी आणि घरबंदी जाहीर करण्यात आली! मला गावात येण्यापासून रोखण्यासाठीच कोरोनाचे कारण देऊन गावबंदी करण्यात आली आहे, असा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणालेत की, रायगड, महाराष्ट्रासह देशात अशाप्रकारची गावबंदी कुठे आहे?, कोर्लईतच गावबंदी का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी येत आहे, असे मी १ जून रोजी कोर्लई ग्रामपंचायत, तहसीलदार आणि अधिकाऱ्यांना कळवले. त्यावर मला प्रशासनाने ४ जून रोजी गावबंदी आणि घरबंदीचा काढण्यात आलेला आदेश मला पाठवला.

कोर्लई गावातून बाहेर पडण्यास तसेच बाहेरून कोर्लईत येण्यास प्रतिबंध आहे. गावातील शेवटचा कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतरही २८ दिवस हा लॉकडाऊन, गावबंदी कायम राहील, असे अलिबाग प्रशासनाने या आदेशात म्हटलं आहे. हा आदेश ३ जूनला रोजीच काढण्यात आला आहे!

अनिश्चित लॉकडाऊन फक्त कोर्लाईसाठीच का?

ठाकरे, वायकर परिवाराच्या १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी येत असल्याने प्रशासनाने आदेश काढला, असे मला म्हणायचे नाही. परंतु गावकऱ्यांवर अशा प्रकारचा अत्याचार, सत्येचा राक्षसी उपयोग कोणत्या कायद्याखाली केला? हा माझा ठाकरे सरकारला प्रश्न आहे, असं ते म्हणाले. कोरोना उपचाराला प्राधान्य देणे ही आमचीही जबाबदारी आहे. परंतु, कोर्लईत सत्तेचा राक्षसी दुरुपयोग करण्यात आला असून त्याचा पुनर्विचार व्हावा. लोकडाऊन ७ – ७ दिवसाचे असतात असे अनिश्चित लॉकडाऊन फक्त कोर्लाईसाठीच आहेत का?, असा प्रश्न त्यांनी केला. (Kirit Somaiya slams administration on 100% lockdown in korlai village, alibaug)

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button