लाचखोर ग्रामसेवक सापळ्यात

Villager was caught accepting a bribe

औरंगाबाद :- फुलंब्रीतील लाचखोर ग्रामसेवकाला अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने मंगळवारी सहा हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. विनय नागोराव अरमाळ (४२) असे त्याचे नाव आहे. वर्ग-३ मधील ग्रामसेवक विनय अरमाळ हा फुलंब्री तालुक्यातील धामणगावचा ग्रामसेवक आहे. त्याने तक्राराच्या भावाचे व इतर दोन नातेवाईकांचे स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत शौचालयाचे अनुदान मंजूर करुन खात्यात टाकण्यासाठी प्रत्येकी दोन हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यावरुन तक्रारदाराने मंगळवारी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोचे अधिक्षक अरविंद चावरिया यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीवरुन ब्युरोने सापळा रचत लाचेची रक्कम स्विकारणा-या ग्रामसेवक अरमाळला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुध्द फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER