
मेरठ :- उत्तर प्रदेशातील मेरठ जवळील मोहम्मद शाकिस्त गावातील शेतकरी सुभाष यांनी त्यांची आवडती म्हैस मेल्यानंतर तिची उत्तरक्रिया केली; गावजेवण दिले! सुभाष लहान होते तेव्हापासून ही म्हईस त्यांच्या घरी (३२ वर्षे) होती. ती दूध देत नव्हती पण, त्यांची आवडती होती म्हणून सुभाष यांनी तिला विकले नाही. ते म्हशीला कुटुंबातील सदस्य मानायचे. वय झाल्यामुळे ती मेली. सुभाष यांनी वाजत-गाजत तिची अंत्ययात्रा काढली. नंतर तिची तेरावी केली. सर्व गावकऱ्यांना प्रसाद वाटला (जेवण दिले). गावकऱ्यांनी म्हशीला श्रद्धांजली अर्पण करून, तिला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. परिसरात या उत्तरक्रियेची चर्चा होते आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला