वीज बिल माफीसाठी २८ नोव्हेंबरपासून गाव बंद आंदोलन

वीज बिल माफीसाठी २८ नोव्हेंबरपासून गाव बंद आंदोलन

कोल्हापूर : ग्राहकांचे सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे; अन्यथा दि. २८ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गाव बंद आंदोलन करण्यात येणार आहे. साखळी पद्धतीने हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीतर्फे प्रताप होगाडे आणि महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिली.

होगाडे म्हणाले, लॉकडाऊन काळातील घरगुती ग्राहकांचे सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीतर्फ प्रताप होगाडे यांची माहिती राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. गाव, शहर, महानगर अशा विविध पातळीवर धरणे आंदोलन, टाळा ठोको अशी विविध प्रकारे आंदोलने करूनही सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सरकार केवळ २० ते ३० टक्के सवलत देण्याची भाषा करीत आहे. सवलत देण्याचे नियोजन नसताना ऊर्जामंत्री मात्र शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची इच्छा असल्याचे सांगतात. थकबाकी, महावितरणचा (MSEDCL) तोटा आणि केंद्राने मदत न करणे, अशी कारणे मात्र ते सांगत आहेत. या सर्व कारणांचा वीज बिलमाफीसाठी काहीच संबंध नाही.

तर तत्काळ निर्णय होऊ शकतो. मुळात कृषिपंपांची ४२ हजार कोटी थकबाकी बोगस आहे. आयोगाने कृषिपंपांची दरवाढ केली असताना, सरकारने सवलत मात्र जाहीर केली नाही. त्यामुळे चौपट वीज बिले वाढली आहेत.

जिल्ह्यातील रोज ३६ गावे बंद ठेवणार साखळी पद्धतीने जिल्ह्यातील सर्व गावे बंद करणार

वीज बिल माफ करण्यासाठी केवळ चार हजार कोटी आवश्यक आहेत. एकदाच चार हजार कोटी देण्यास सरकार धजत नाही आणि दरवर्षी आठ ते दहा हजार कोटी कसे देणार, म्हणजेच हा कल्पनाविलास आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने निर्णय घेऊन घरगुती ग्राहकांना वीज बिल माफ करावे; अन्यथा साखळी पद्धतीने गावबंद आंदोलन करण्यात येणार आहे. २८ नोव्हेंबरपासून प्रत्येक तालुक्यातील तीन गावे अशी एकूण ३६ गावे रोज बंद ठेवण्यात येणार आहेत. हातकणंगले तालुक्यापासून आंदोलनास सुरुवात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER