‘करोना’विरुद्ध लढण्यासाठी विकी कौशलने केली १ कोटीची मदत

मुंबई :- करोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांकडे मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला देशवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अगदी सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत अनेक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार सरकारला मदत करत आहेत. करोनाविरुद्ध पुकारल्या गेलेल्या या युद्धात अभिनेता विकी कौशही सामील झाला आहे. विकीने PM Cares फंड आणि महाराष्ट्र चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये एक कोटी रुपयांची रक्कम मदत म्हणून दिली आहे.

विकीने अशी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. ‘आज मी माझ्या कुटुंबीयांसोबत घरात बसलो आहे आणि हे मी माझे भाग्यच समजेल. पण काही लोक असे आहेत जे घरी राहू शकत नाही. या कठिण काळासाठी मी PM Cares फंड आणि महाराष्ट्र चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये एक कोटी रुपयांची रक्कम मदत म्हणून देत आहे. आज आपण एकमेकांसोबत आहोत आणि मला खात्री आहे आपण एकत्र यातून बाहेर पडू,’ असे पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे.