युवासेनेच्या विक्रम राठोड यांची विधान परिषदेवर नियुक्ती करा; कार्यकर्त्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Vikram Rathore-CM Uddhav Thackeray.jpg

अहमदनगर :- युवासेनेचे विक्रम राठोड (Vikram Rathore) यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करा, अशी मागणी नगरच्या कार्यकर्त्यांनी केली आहे . अहमदनगर जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाठवलं आहे. शिवसैनिकांना (Shivsena) ताकद देण्यासाठी अनिलभैय्या राठोड यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी विक्रम राठोड यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर नियुक्ती करावी, असा या पत्रात म्हटले आहे .

दुसरीकडे विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित आमदारांच्या नियुक्त्यांना लवकरच मुहूर्त मिळणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहेत. तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसेंसह आदेश बांदेकर, आशिष देशमुख, वरुण सरदेसाई, सत्यजीत तांबे, सचिन सावंत, सचिन अहिर अशा 17 जणांच्या नावांची चर्चा आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER