विखे पाटलांकडून कोरोना संसर्गाची खबरदारी; साखर कारखान्यातील कर्मचा-यांच्या केल्यात कोरोना चाचण्या

Radhakrishna Vikhe Patil

अहमदनगर: कोरोनाचा (Corona Virus) भारतात शिरकाव झाल्यानंतर भारताने काही महिने कडकडीत बंद पाळला. बंद दरम्यान कोरोनाचे रुग्ण (Corona patient) मर्यादित होते मात्र, भारताची आर्थिक स्थिती व सरवसामान्यांचे हाल पाहता काही महिन्यात लॉकडाऊन शिथिल करावा लागला. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर देशात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढू लागले. अनेकांना मृत्युला समोर जावे लागले. परंतु, अर्थचक्र हलविण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून उद्योगधंदे सुरू करणेही तेवढेचे गरजेचे बनले. आता भारतात चवथा अनलॉक सुरू झाला आहे. या टप्प्यात अधिकच शिथिलता आणून जवळपास सर्वच उद्योग सुरू झाले आहेत. त्याचबरोबर कोरोनाचे रुग्णही वाढत असून सामुहिक संसर्गाची भीतीदेखील व्य़क्त केली जात आहे. या पार्श्वभूमिवर खबरदारी घेत पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. प्रवरानगर येथे कारखाना कार्यस्थळावरील रुग्णालयात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गळीत हंगामासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून कोरोनाविषयी खबरदारी घेण्यात येत असून डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे, चेअरमन आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

विखे पाटील यांचे सुपुत्र भाजपाचे खासदार तसेच स्वतः डॉक्टर आहेत. कोरोना काळात देखील सामाजिक बांधिलकी जपत विखे परिवाराने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत. आताही कारखाना सुरू करताना कर्मचा-यांची खबरदारी घेत कामगारांच्या कोरोना चाचण्या करून घेण्यासाठी विखेंनी पुढाकार घेतला आहे.

या चाचण्या करण्यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम नेमण्यात आली असून दररोज 250 ते 300 कामगारांच्या चाचण्या केले जाणार आहेत. तसेच त्यानंतर येणाऱ्या रिपोर्टनुसार कामगारांना आरोग्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER