विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे काँग्रेसच्या वाटेवर

vijaysinh-mohite-patil-nephew-dhawalsinh-mohite-patil-to-join-congress

मुंबई : भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh mohite patil) यांचे पुतणे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे . धवलसिंह मोहिते पाटील (Dhawalsinh mohite patil) उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील(Mohite Patil) यांचे पुत्र आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार आणि पक्षासोबत असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडली. रणजीतसिंह यांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या मंचावर उपस्थित होते. भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं विजयसिंहांनी लोकसभा निवडणुकीवेळी जाहीर केलं होतं. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राष्ट्रवादीला माळशिरस तालुक्यात मोठा धक्का बसला होता .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER