विद्या बालनच्या ‘शेरनी’मधून विजयराज बाहेर

Vijayraj out of Vidya Balan's 'Sherni'

काही दिवसांपूर्वी एका सहाय्यक दिग्दर्शिकेने प्रख्यात अभिनेता विजय राज वर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर पोलिसांनी विजय राजला अटकही केली होती. मात्र नंतर विजय राजला जामिनावर सोडण्यात आले. असे असले तरी ज्या चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली त्या चित्रपटातून विजय राजला (Vijayraj ) बाहेर करण्यात आले आहे.

अमित मसुरकर दिग्दर्शित ‘शेरनी’ (‘Sherni’) चे शूटिंग काही दिवसांपूर्वी बालाघाट येथे सुरु करण्यात आले होते. विद्या बालन (Vidya Balan)यात मुख्य भूमिका साकारीत आहे. विजय राज या चित्रपटात अत्यंत महत्वाची भूमिका साकारीत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी एका महिला सहाय्यक दिग्दर्शिकेने विजय राजवर आरोप केला आणि खळबळ माजली. विजय राजने आपला तसा काही हेतू नसल्याचे सांगितले. मात्र यूनिटमधील सगळ्यांच्या दबावामुळे विजयराजने त्या महिलेची माफीही मागितली होती. परंतु विजय राजने माफी मागितली तरीही त्या महिलेचे समाधान न झाल्याने तिने पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी विजय राजला अटक केली. आता विजयराज जामिनावर असला तरी निर्मात्यांनी त्याला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र यामुळे निर्मात्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. विजय राजवर काही दृश्ये अगोदरच चित्रित झालेली असल्याने त्याच्या जागी नवा कलाकार सोधून आता पुन्हा त्या सगळ्या दृश्यांचे शूटिंग नव्याने करावे लागणार आहे. यासाठी निर्मात्याला दिवसाला 20 लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER