सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही मिटकरींवर केलेली कारवाई योग्यच : विजय वडेट्टीवार

Vijay Wadetivar - Amol Mitkari

नागपूर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार सत्ताधारी कोण, विरोधक कोण हे बघत बसत नाही. कोरोना (Corona) प्रतिबंधक नियम मोडल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आम्ही सत्ताधारी वैगेरे बघत नाही, असं मत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केलं. मिटकरी (Amol Mitkari) यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वडेट्टीवार बोलत होते.

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे आणि अटींचे नागरिकांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिलेले आहेत. शिवजयंती साजरी करताना कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. यातून एकच सिद्ध होतं की, महाविकास आघाडीचं सरकार सत्ताधारी कोण, विरोधक कोण वैगेरे बघत नाही. नियम मोडल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला, असं वडेट्टीवार म्हणाले.

आमदार मिटकरींसह ३०० जणांवर गुन्हा दाखल
आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला शेकडो लोक उपस्थित होते. या मिरवणुकीत सरकारने लागू केलेल्या कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवण्यात आले. या प्रकरणी दहीहंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्यासह ३०० ते ४०० जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER