पासपोर्टप्रकरण : मंत्री वडेट्टीवार यांना हाय कोर्टाचा दिलासा; याचिका फेटाळली

vijay wadettiwar

मुंबई : अवैध पासपोर्टप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांची पासपोर्टप्रकणावरून मंत्री वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या विरोधातील याचिक फेटाळली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपलं नाव चर्चेत असल्यामुळे आपलं पासपोर्टप्रकरण टायमिंग साधत काढण्यात आलं, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी हा निर्णय दिला. पासपोर्ट विभागाला प्रकरणाची चौकशी करू द्या. त्यानंतर एफआयआर दाखल न झाल्यास याचिकाकर्त्याला न्यायालयात येता येईल. चौकशीपूर्वीच एफआयआर दाखल करण्याचा आदेश देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. भांगडिया यांनी केलेल्या याचिकेत विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणारे  गुन्हे लपवल्याचा आरोप केला होता.

भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. त्यावर कारवाई झाली नाही म्हणून ते शेवटी हाय कोर्टात गेले. अधिक माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा कायमचा पत्ता (पर्मनंट ऍड्रेस) दिला होता. तेथील पोलीस ठाण्यामधून एनओसी घेतली होती. त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत असे नमूद होते. त्यामुळे भांगडिया हाय कोर्टात गेले. त्यावेळी हाय कोर्टाने पासपोर्ट ऑफिसला पाठवण्यासाठी नोटीस काढली. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला असल्याची चर्चा सुरू होती.

माझ्या विरोधातील षडयंत्र : मंत्री वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार म्हणाले की, पासपोर्टप्रकरण उकरून काढणं म्हणजे, किरकोळ आहे. त्यात एवढं काही नाही. राजकारणात बदनामीचं  षडयंत्र करणं सुरूच असतं. त्यामध्ये एवढा मोठा विषय नाही. पण टायमिंग साधला गेलाय. शेवटी राजकारण आहे, राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपण कोणावर आरोप करण्यापेक्षा आपल्या हातून काय चुका झाल्यात त्यावर चर्चा करून चुका होऊ नयेत म्हणून पुढे जाणं हा राजकारणातील गुणधर्म आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER