विजय वडेट्टीवार यांच्याकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : वीरेंद्र पवार

विरेंद्र पवार - विजय वडेट्टीवार

मुंबई : मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याविरुद्ध मराठा समाज (Maratha Community) चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. वडेट्टीवार यांची सरकारमधून हकालपट्टी करा, मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा, अशी मागणी मोर्च्याचे समन्वयक वीरेंद्र पवार (Virendra Pawar) यांनी केली आहे . इतकेच नाही तर वडेट्टीवार यांच्याकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला .

ओबीसी आरक्षण हे केवळ १० वर्षांसाठी देण्यात आले होते . यानंतर अनेक अमेंडमेंट झाले, बदल झाले, आरक्षण हे कुण्या एका समाजासाठी नाहीय. त्यामुळे कुणीही हा गैरसमज बाळगू नये. आजपासून आम्ही मराठा संघर्ष यात्रा आणि मराठा जोडो आंदोलनाला सुरुवात केली असल्याचेही पवार म्हणाले .

दरम्यान मराठा समाजावर अन्याय नको; पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरी भरतीसाठी ओबीसी समाज (OBC Community) रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढतोय. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकर भरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको, अशा भावनाही विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER