ओबीसीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखणारे आम्ही पहारेकरी – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar

जालना : एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत, अशी ग्वाही बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली.

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. आवश्यकता पडल्यास स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव मी विधानसभेत मांडेन. संधी मिळेल तेथे ओबीसी समाजाचा आवाज उचलून धरणार. पक्ष, जात विसरून फक्त आणि फक्त ओबीसी म्हणून उभा आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणालेत.

ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी आज (रविवारी) जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. मोर्चात ‘आता मुख्यमंत्री ओबीसीचाच’ असे फलक झळकवण्यात आले. या मोर्चाला सुरुवातीस पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती. नंतर सशर्त परवानगी देण्यात आली.

वडेट्टीवार यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची देखील आठवण काढली. म्हणालेत, आपल्याला लढण्याची प्रेरणा गोपीनाथ मुंडे यांच्याकडूनच मिळाली; त्यांच्या संघर्षाला सलाम देखील केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER