त्यांच्या पक्षाचा लवकरच सफाया होईल ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भडकले

Chandrakant Patil-Vijay Vattetiwar

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vattetiwar) यांनी साधू आणि संत यांची तुलना करताना साधू विषयी केलेल्या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला.

वडेट्टीवार असो किवा दोन्ही काँग्रेसचे इतर नेते असो… हे लोकं आताही हे स्वीकार करू शकत नाहीत की, मोदी सरकारमध्ये राम मंदिराचे निर्माण कार्य होत आहे आणि देशाचा प्रत्येक हिंदू या महान कार्यात आपले योगदान देण्यासाठी पुढे येत आहे. यासाठी हे आपल्या साधू-संताचा अपमान करत आहेत. कधी पालघरमध्ये झालेल्या संतांच्या हत्येच्या घटनेला दाबून टाकतात, तर कधी साधूंना नालायक म्हणतात. हिंदुस्तानाच्या राजकारणातून अशा प्रकारची विचारसरणी असलेल्या नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा लवकरच सफाया होईल, असा संताप पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान साधू हे नालायक असतात, असे विधान वडेट्टीवार यांनी केले होते . त्या विधानावर त्यांनी खुलासाही केला. ‘महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या विचारधारेवर महाराष्ट्र उभा आहे. संत आणि साधू यामध्ये फरक आहे. संत हा समाजासाठी समर्पित असतो. संत दिशादर्शक असतात. साधू हे समाजाला लुबाडणारे आहे. त्यावर आजही मी ठाम आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER