मोदी एक दगडात दोन तर पवार एका दगडात चार पक्षी मारतात : वडेट्टीवार

Vijay Vadettiwar on Sharad Pawar and pm modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा घ्यायचा होता तर पाच वर्षांपूर्वीच मंत्रिमंडळात का घेतलं नाही?, असा सवाल उपस्थित करत कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी एका दगडात दोन पक्षी मारायचे मात्र शरद पवार हे एका दगडात चार पक्षी मारतात.

शरद पवार हे एका मुलाखतीत म्हणाले होते पाच वर्ष सरकार स्थिर राहील. त्यामुळे आम्हाला स्थिरतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले तीन पक्षांचं हे सरकार बनवायला एक महिना लागला तो पूर्णत: अभ्यासाअंती हा निर्णय घेतला गेलेला आहे. राष्ट्रवादी भाजप सोबत जाण्याचा विषय आता संपला आहे. पक्ष निहाय खाते वाटपाचा विषय वरिष्ठ पातळीवर सोडवला जाईल. त्यानंतर अधिवेशनाच्या अगोदर विस्ताराचा ही विषय संपावा अशी आमच्या हायकमांडची इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितलं.

मोदींच्या प्रस्तावावर 15 दिवसांनंतर खुलासा का केला : भाजपचा शरद पवारांवर हल्ला बोल

वडेट्टीवार सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरूच आहे. बच्चू कडू म्हणतात म्हणून ती करायची गरज नाही. ज्यांनी बैलगाडीभरुन पुरावे आणले होते त्यांना काहीच मिळाले नाही. तरी पण कुणाला चौकशी करायची असेल तर होऊन जाऊ द्या. एकदा हा विषय संपला पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.