आज खडसे, उद्या माझा नंबर लागेल ; काँग्रेसच्या बड्या नेत्याची टीका

Vijay Vadettiwar on Eknath Khadse.jpg

मुंबई :- भाजपाला (BJP) सोडचिठ्ठी देत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) मागे ईडीचा (ED) ससेमिरा लागला आहे. ईडीने त्यांनी 30 डिसेंबरला हजर राहण्याची नोटीस पाठविल्याचे सांगितले जात आहे. यावरून काँग्रेसचे आमदार आणि ठाकरे सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी मोठी भीती व्यक्त केली आहे.आज खडसे, तर उद्या माझाही नंबर लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाला हा धंदा खूप महागात जाईल असा इशाराही वड्डेटीवार यांनी दिला आहे.

दरम्यान गेल्याच महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांना ईडीने नोटीस पाठविली होती. यानंतर त्यांच्या घरीदेखील छापे मारले होते. यामुळे आधीच केंद्र विरोधात राज्य सरकार असा कलगीतुरा रंगलेला असताना शुक्रवारी रात्री खडसेंना ईडीने नोटीस पाठविल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा भाजपा विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये वादंग पेटले आहे.

ही बातमी पण वाचा : ईडीची नोटीस मिळाली, एकनाथ खडसेंची कबुली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER