अर्थसंकल्प २०१९ ; महिलांच्या विकासासाठी मोदी सरकारची ‘नारी टू नारायणी’ योजना

Nirmala Sitharaman

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या पार्वतला पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे . यादरम्यान महिलांच्या विकासासाठी मोदी सरकारने नवा नारा दिला आहे. ‘नारी टू नारायणी’ ही योजना मोदी सरकारने लागू केली असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली .

ही बातमी पण वाचा : अंदाजपत्रक २०१९ – २० : अर्थव्यवस्था या वर्षीच ३ ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य गाठेल

ग्रामीण महिलांची अर्थव्यवस्थेची जी भागीदारी त्याअंतर्गत ही योजना आखण्यात आली आहे . या योजनेमधून महिलांना प्रोत्साहन मिळेल. महिलांचे उद्योग क्षेत्रात वाढणारे पाऊल या अनुषंगाने महिला केंद्रीत योजना बनवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. महिलांच्या नेतृत्वात उद्योगात भरारी घेण्याचं मोदी सरकारचा मानस असल्याचे निर्मला सीतारामन म्हणाल्या. इतकेच नाही तर मुद्रा योजनेत देखील 1 लाखांपर्यंत महिलांसाठी कर्जसुविधा असणार आहे.

ही बातमी पण वाचा : शेतक-यांचे 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करणारा अर्थसंकल्प : मोदी

दरम्यान या अर्थसंकल्पात त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार चालू शकणार आहे ही महत्त्वाची घोषणा केली. तसेच सोनं आणि इंधन यावरचा कर वाढवला आहे त्यामुळे आता सोनं आणि पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे.


साभार : राज्यसभा टेलिव्हिजन