एखाद्या समाजासाठी तलवार काढण्याची भाषा चुकीची ; वड्डेटीवारांची संभाजीराजेंवर टीका

Vijay Vattetiwar-Sambhajiraje

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे . मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेन, असा सज्जड इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी तुळजापुरातून सरकारला दिला. त्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार (Vijay Vaddetiwar) यांनी संभाजीराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शाहू राजांची गादी चालवणारे खासदार संभाजीराजे यांची एखाद्या समाजासाठी तलवार काढण्याची भाषा चुकीची आहे, असे वड्डेटीवार म्हणाले .

बहुजन लोकांसाठी आरक्षण देणाऱ्या राजाचे वारसदार वेगळी भाषा बोलतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत इतर बलुतेदार होते. विरोध करणारे मोरे, जावळे होते, हा इतिहास आहे. राजाची भूमिका जनतेची हवी, केवळ एकाद्या समाजासाठी तलवार काढणे भाष्य योग्य नाही, अशा शब्दांत विजय वड्डेटीवार यांनी संभाजीराजेंना टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER