पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला नेण्याचा पवारांचा डाव, शिवसेना नेत्याचा आरोप

vijay shivtare & Sharad Pawar

पुणे : जिल्ह्यातील पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळावरुन आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला नेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी केला. मात्र, कुठल्याही परिस्थितीत पुरंदरचं विमानतळ बारामतीला नेऊ दिले जाणार नाही. जर असे झाल्यास जिल्ह्यात मोठं आंदोलन उभं करु. असा गर्भित इशारा विजय शिवतारे यांनी पत्रपरिषदेत दिला.

पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलून ते बारामतीच्या वेशीवर घेऊन जाणे हे मोठं षडयंत्र आहे. विमानतळाची आधीची पारगाव आणि सात गावांची जागा बदलून नव्यानं रिसे, पिसे, पांडेश्वर आदी गावातील म्हणजे पुरंदर तालुक्यातील जागा घ्यायची आणि विमानतळाचं प्रवेशद्वार बारामतीच्या बाजूला करुन तिकडचा विकास साधायचा. मग, विमानतळाच्या मागे पुरंदरमध्ये झोपडपट्टी होणार आणि सर्वांगिण विकासाची संधी जाणार. त्यामुळे हे षडयंत्र आपण जनतेला बरोबर घेऊन हाणून पाडण्यास सज्ज आहोत, असा इशाराच शिवतारे यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER