Vijay Hazare Trophy: IPL पूर्वी सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मोठा धक्का, स्पर्धे बाहेर

Arjun Tendulkar

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा विजय हजारे ट्रॉफी 2021 मध्ये मुंबई संघात समावेश झालेला नाही.

भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar) मोठा धक्का बसला आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२१ साठी संघाची घोषणा करण्यात आली असून त्यात अर्जुनच्या नावाचा समावेश नाही.

मुंबई संघाच्या बाहेर झाला अर्जुन

२० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची मुंबई संघाचा कर्णधार म्हणून तर सलामीवीर पृथ्वी शॉची मुंबई संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अर्जुन तेंडुलकरला मोठा धक्का बसला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने घरगुती ५० षटकांच्या चॅम्पियनशिपसाठी सचिनच्या मुलाचा २२ सदस्यीय संघात समावेश केलेला नाही.

अर्जुनची खराब कामगिरी

अर्जुन तेंडुलकर यंदा प्रथमच वरिष्ठ संघात दाखल झाला होता. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघात संधी देण्यात आली. लिट ई लीग ग्रुप सामन्यात त्याने पदार्पण केले. त्या सामन्यात अर्जुनने दोन षटकांत १ गडी बाद करून २१ धावा दिल्या.

अर्जुन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी संघाचा एक भाग होता, परंतु सराव सामन्यांमध्ये त्याची कामगिरी खूपच खराब होती. सराव सामन्यांमध्येही त्याने खूप संघर्ष केला. टूर्नामेंटच्या सराव सामन्यांमध्ये अर्जुन तेंडुलकर टीम D साठी 4 सामने खेळला. पण त्याची कामगिरी बॅट आणि बॉल दोन्हीने खराब होती. त्याने खेळलेल्या ४ सामन्यात ४ बळी घेतले. त्याचवेळी या सामन्यात त्याला ३ वेळा फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये तो केवळ ७ धावा करू शकला.

मुंबई संघात मिळाली या खेळाडूंना संधी

विजय हजारे ट्रॉफीच्या मुंबई संघात फलंदाजी विभागात भारतीय अष्टपैलू शिवम दुबे, मर्यादित षटकातील तज्ज्ञ सूर्यकुमार यादव, युवा सलामीवीर यशस्वी, सरफ्रझ खान आणि अखिल हरवाडकर यांच्यासह अनुभवी विकेटकीपर फलंदाज आदित्य तरे यांचा समावेश आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी याच्या नेतृत्वात गोलंदाजीचा हल्ला होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER