भाजपचे विजय अग्रवाल अकोलाच्या महापौरपदी

तर उपमहापौरपदी भाजपचे वैशाली शेळके विराजमान

Akola

अकोला : काँग्रेसच्या उम्मेदवारावर मात करून भाजपचे विजय अग्रवाल अकोलाच्या महापौरपदी विराजमान झाले आहेत. विजय अग्रवाल हे महापौरपदी तर उपमहापौरपदी वैशाली शेळके या विराजमान झालेत. त्यामुळं महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. महापौरपदी विराजमान झालेले विजय अग्रवाल हे स्थायी समितीचे माजी सभापती आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ते महापालिकेत नगरसेवक आहेत.

भाजपचे विजय अग्रवाल यांना ४९ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या मोहम्मद नौशाद यांना १७ मतं मिळाली. अकोला महापालिकेत भाजपला ८० पैकी ४८ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे 8, राष्ट्रवादीचे 5 आणि एमआयएमचा 1 आणि 1 अपक्ष तटस्थ राहिले आहेत.

कॉग्रेसतर्फे महापौरपदासाठी शेख नौशाद तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्याच सुवर्णरेखा जाधव निवडणूक रिंगणात होत्या त्यांना अनुक्रमे १७ मते मिळाली. या निवडणुकीत भारतीय रिपब्लिकन पक्ष-बहुजन महासंघाच्या तीन नगरसेवकांनी काँग्रेसला पाठींबा दिला तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडणूक प्रक्रियेत तटस्थ होते. भाजपाचे उमेदवार निवडून आल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.