विहंग घोटाळा : प्रताप सरनाईकांच्या नावाचे ११२ सात-बारा सोमय्या यांनी ईडीला (ED) केले सादर

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याविरुद्ध विहंग सोसायटी घोटाळ्याची ईडीकडे तक्रार करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुरावा म्हणून सरनाईक यांच्या नावाचे ११२ सात-बारा ईडीकडे सादर केले आहेत. (Kirit Somaiya files complaint against Pratap Sarnaik at ed)

प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांची चार तासांपासून ईडी चौकशी करते आहे. दुसरा मुलगा पूर्वेश सरनाईक आज नोटीस देऊनही ईडीसमोर हजर झाला नाही. पूर्वेशला आतापर्यंत दोन समन्स बजावण्यात आले आहेत.

विहंग यांची दुसऱ्यांदा ईडीची चौकशी सुरू असतानाच किरीट सोमय्या अचानक ईडी कार्यालयात पोहोचले. विहंग हौसिंग सोसायटीच्या घोटाळ्याची ईडीला माहिती दिली. सरनाईक यांनी या सोसायटीतील काही संपत्ती हडप केल्याचा आरोप करताना सरनाईक यांच्याकडे जमिनीच्या व्यवहाराचे ११२ सात बारा असल्याची तक्रार केली.

सरनाईक यांनी २५० कोटी रुपये हडप केले. कंपनीचे नावही बदलले. सरनाईक यांनी ज्यांच्या संपत्ती जप्त केल्या त्यांची नावे सातबाऱ्यावर नसल्याचा दावा करताना सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली.

घोटाळा

सोमय्या यांनी १६ डिसेंबरला ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे. याबाबत महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते व दोन दिवसात त्यांनी तक्रार दाखलही केली.

सरनाईकांकडून खंडन

विहंग गार्डन्स ही इमारत अनधिकृत नाही. माझी बदनामी केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात मी कोर्टात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER