विद्युत जमवालने स्टंटमन्सच्या आईचे व्हीडियो मेसेजच्या माध्यमातून मानले आभार

Vidyut Jamwal

बॉलिवूडमधील अ‌ॅक्शन हीरोंमध्ये विद्युत जमवालचे (Vidyut Jamwal) नाव वरच्या स्थानावर घेतले जाते. विद्युत मार्शल आर्ट एक्सपर्ट असून त्याने केरळच्या प्रख्यात कलरयापट्टू या विद्येत प्राविण्य मिळवलेले आहे. त्याच्या सिनेमात तो त्याचे हे कौशल्य नेहमीच दाखवत असतो. याच विद्युतने शनिवारी त्याच्या एका सिनेमाचे अ‌ॅक्शन सीन्स पूर्ण झाल्यानंतर सर्व स्टंटमन्सच्या आईंना अभिवादन करण्यासाठी एक व्हीडियो मेसेज तयार करून त्यांचे आभार मानत त्यांची मुले सुखरूप असल्याचे म्हटले आहे.

विद्युतने रिलीज केलेल्या व्हीडियोमध्ये तो गाडी चालवताना दिसत आहे. बॅकग्राऊंडला अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘केसरी’ सिनेमातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणे ऐकायला येते. गाणे ऐकवत विद्युत म्हणतो की, हे गाणे मी सर्व स्टंटमन्सच्या आईंना समर्पित करीत आहे. यासोबत विद्युतने एक मेसेज तयार केला आहे. या मेसेजमध्ये विद्युत म्हणतो, ‘आई, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि नेहमी आम्ही आमची काळजी घेऊ. तुझ्यासाठी.’ विद्युत पुढे म्हणतो, ‘हा मेसेज त्या सगळ्यांसाठी आहे जे रोज सकाळी कामासाठी घराबाहेर पडतात. ते कामावर निघतात तेव्हा त्यांची आई म्हणते, बाळा काळजी घे. मी नुकतेच माझ्या नव्या ‘सनक’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. या सिनेमातील सर्व अ‌ॅक्शन सीन पूर्ण झाले आहे. आणि मला सांगायला आऩंद होतो की सगळे स्टंटमन सुखरूप आहे. हा मेसेज त्यांच्यासाठीही आहे जे अ‌ॅक्शन आणि स्टंट करतात आणि त्यांची आई त्यांची काळजी करीत असते. आई तुम्ही घाबरू नका. आम्ही नेहमी आमची काळजी घेऊ. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER