विद्या सिन्हाने वयाच्या १८ व्या वर्षीच केली होती आपल्या कारकिर्दची सुरुवात, वैयक्तिक आयुष्यामुळे राहिली चर्चेत

Vidya Sinha

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री विद्या सिन्हा (Vidya Sinha) यांचा वाढदिवस आज म्हणजे १५ नोव्हेंबरला आहे. त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीच्या अभिनेत्री होत्या. विद्या सिन्हा यांनी अगदी लहान वयातच काम करण्यास सुरवात केली. चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. विद्या सिन्हा यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक हुशार आणि दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

विद्या सिन्हा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४७ रोजी मुंबई येथे झाला होता. त्यांनी मुंबई येथून शिक्षण घेतले. विद्या सिन्हा यांनी वयाच्या १८ व्या वर्षी काम करण्यास सुरुवात केले. त्यांनी मॉडेलिंगच्या कारकिर्दीला सुरुवात केले. त्यांनी मिस बॉम्बेचे विजेतेपदही जिंकले होते. त्यानंतर त्यांनी चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला. छोटू बिहारी यांच्या ‘राज काका’ या चित्रपटाद्वारे विद्या सिन्हा यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या करियरची सुरूवात केली होती.

यानंतर विद्या सिन्हा बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसल्या. ‘रजनीगंधा’, ‘हवस’, ‘छोटी सी बात’, ‘मेरा जीवन’, ‘इनकार’, ‘जीवन मुक्त’, ‘किताब’, ‘पति पत्नी और वो’, ‘तुम्हारे लिए’, ‘सबूत’ यासह त्यांनी बर्‍याच शानदार चित्रपटांमध्ये काम केले आणि मोठ्या पडद्यावर अमिट छाप सोडली. त्यांचा ‘पति पत्नी और वो’ चे गाणे ‘ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए’ हे गाणे बरेच गाजले होते.

चित्रपटांशिवाय विद्या सिन्हा टीव्ही इंडस्ट्रीत देखील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी ‘काव्यांजलि’, ‘जारा’, ‘नीम नीम शहद शहद’, ‘कुबूल है’, ‘इश्क का रंग सफेद’आणि ‘चंद्र नंदिनी’ या टीव्ही मालिकांमध्ये काम केल्या आहेत. विद्या सिन्हा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहत होत्या. त्यांचे दोन विवाह झाले होते. विद्या सिन्हा यांचे पहिले पती वेंकटेश्वर अय्यर होते. ते तामिळ ब्राह्मण कुटुंबातील होते. विद्या आणि व्यंकटेश्वराचे १९६८ मध्ये लग्न झाले. यानंतर १९८९ मध्ये त्यांनी जाह्नवी नावाच्या मुलीला दत्तक घेतले.

विद्या यांचे पहिले पती व्यंकटेश्वर अय्यर खूप आजारी राहत होते आणि १९९६ मध्ये त्यांचे निधन झाले. पतीच्या मृत्यूमुळे विद्या यांना धक्का बसला. त्यानंतर विद्या सिडनीला गेल्या. तिथे त्यांची नेताजी भीमराव साळुंके या ऑस्ट्रेलियन डॉक्टरशी भेट झाली. काही काळानंतर दोघांनीही मंदिरात लग्न केले. या लग्नानंतर विद्या खूप अस्वस्थ होऊ लागल्या होत्या. ९ जानेवारी, २००९ रोजी त्यांनी नेताजी भीमराव यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. प्रकरणानंतर विद्या आणि नेताजी भीमराव यांचे घटस्फोट झाले होते. मागील वर्षी म्हणजे १५ ऑगस्ट २०१९ रोजी विद्या सिन्हा यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER