चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपात प्रवेश

Veerappan - Vidya Rani

मुंबई : कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनची मुलगी विद्या राणी हिने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. तामिळनाडूमधील कृष्णानगरी येथे पार पडलेल्या पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये विद्या राणीने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला .

“कोणाचीही जात आणि धर्म न पाहता मला गरिबांसाठी आणि मागासवर्गातील लोकांसाठी काम करायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लागू करण्यात आलेल्या सरकारी योजना सामान्य लोकांसाठी आहेत. मला त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवायच्या आहेत. ” असं मत पक्षप्रवेशानंतर विद्यानं व्यक्त केलं. “माझ्या वडिलांनी निवडलेला मार्ग चुकीचा होता. मात्र त्यांनी नेहमीच गरिबांचा विचार केला. ” असेही त्या म्हणाल्या.

भाजपाचे सरचिटणीस मुरलीधर राव आणि माजी केंद्रीय मंत्री पॉन राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत विद्या राणीने भाजपापचे कमळ हाती घेतले.