अभिनेत्री विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Vidya BALAN

मुंबई : जगप्रसिद्ध गणितज्ञाच्‍या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित आत्‍मचरित्रावर आधारित चित्रपट ‘शकुंतला देवी’ (Shakuntala Devi) चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्‍ये राष्‍ट्रीय पुरस्‍कार विजेती अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) शकुंतला देवीची भूमिका साकारली आहे. मानवी संगणक’ म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या शकुंतला देवी या जगप्रसिद्ध गणितज्ञ असण्‍यासोबतच त्‍यांच्‍या काळातील एक अग्रणी महिला होत्‍या. हा चित्रपट गणितज्ञ शकुंतला देवीबाबत असण्‍यासोबतच हुशार, असुरक्षित व मर्यादित असलेली महिला व आई शकुंतलाबाबत देखील आहे.

चित्रपट शकुंतला देवीचे दिग्‍दर्शन अनु मेनन यांनी केले असून आणि सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स प्रॉडक्‍शन्‍स व विक्रम मल्‍होत्रा (एबंडंशिया एंटरटेन्‍मेंट) यांची निर्मिती असलेल्‍या या आत्‍मचरित्रावर आधारित चित्रपटामध्‍ये सन्‍या मल्‍होत्रा देखील आहे. ती शंकुतला देवीच्‍या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्‍ये कलाकार जीशू सेनगुप्‍ता आणि अमित साध हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER