विधानसभा अध्यक्षांकडून सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Sudhir Mungantiwar

मुंबई: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार यांच्यासह विधिमंडळ सदस्य व विधानमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.