ईव्हीएम हटवल्याशिवाय राज्यात विधानसभा निवडणूक होऊ देणार नाही – प्रकाश आंबेडकर

बुलढाणा : लोकसभा निवडणुकांदरम्यान ईव्हीएम मशीनवर विरोधकांकडून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले; परंतु सत्ताधा-यांनी याकडे काणाडोळा करून ईव्हीएमच्या माध्यमातूनच मतदान पूर्ण केले; विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांनी होणार आहेत.  तेव्हा ईव्हीएम हटवल्याशिवाय राज्यात विधानसभा निवडणूक होऊ देणार नाही, असा पवित्रा बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी  दिली.

लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी मतदान केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएममध्ये घोळ असून मत भाजपलाच जातंय, असा आरोप केला होता. तसंच, लोकांचा पाठिंबा  असतानाही लोकसभेत झालेला पराभव आम्हाला मान्य नाही.  ईव्हीएमध्ये घोटाळा करून भाजपचा विजय झाला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अशोक सोनोने यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : आम्ही भाडेकरु नाही तर, भागीदार आहोत; ओवेसींची मोदींवर टीका

तर राज्यभरात ईव्हीएम विरोधात ‘ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव’ असा नारा देत आक्रमक आंदोलन करणार असल्याचे अशोक सोनोने यांनी सांगितले.

लोकसभेच्या निकालानंतर ईव्हीएमवरील विश्वास उडाला आहे, असेही सोनोने यांनी यावेळी म्हटले. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वीच ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती, अशी माहिती सोनोने यांनी यावेळी दिली.