शिवसेनेकडून नीलम गोऱ्हेंना विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी

Bhai Girkar-Neelam Gohre

मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (MVA) आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपनेही आपला उमेदवार रिंगणार उतरवला.शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून भाई गिरकर (Bhai Girkar) हे नाव समोर आले आहे .

विधानपरिषद निवडणुकीत गैरहजर आमदारांना मतदान करण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी विधानपरिषद सभापतींना पत्र दिले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने नीलम गोऱ्हे यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यानंतर भाजपकडून भाई गिरकर यांनी अर्ज भरला. परंतु, महाविकास आघाडीकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. शक्यतो ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सेनेचा प्रयत्न असणार आहे. पण, भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

दरम्यान विधानपरिषद उपसभापती पदासाठी निवडणूक होऊ नये, यासाठी भाजपने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER