VIDEO: काश्मीरवर हल्ला करून गजवा-ए-हिंद इच्छितो शोएब अख्तर, वायरल व्हिडीओ मधून पसरवले विष

Shoaib Akhtar

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) एक जुना व्हिडिओ काही काळापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो काश्मीरविरूद्ध बोलत गजवा-ए-हिंद विषयी बोलत आहे. सतत वादात राहणारा अख्तर या व्हिडिओमध्ये बोलत असताना भारताविरूद्ध विष पसरवतांना दिसत आहे. तो काश्मीरचा संदर्भ देत गजवा ई हिंदचा उल्लेख करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये अख्तर पाक या पुस्तकाचा उल्लेख करत म्हणत आहे कि यात लिहिले आहे कि ‘गजवा-ए-हिंद’ (Gajwa-e-Hind) जागा घेईल आणि नदी परत रक्ताने लाल होईल. अफगाणिस्तानातून सैन्य अटॉक येथे पोहोचेल. शामल मशरीकहून उठल्यानंतर विविध संघ उझबेकिस्तानहून दाखल होतील. हे सर्व एक ऐतिहासिक प्रदेश खोरासनचा सांगते, जो लाहोरपर्यंत विस्तारला गेला होता.’

यानंतर मुलाखतीत या महिला अँकरने त्याला विचारलं की लोकांनी ते वाचलं पाहिजे का, अख्तर याला उत्तर देत म्हणाला की आम्ही आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि मग गजवा हिंदसाठी सर्व बाजूंनी भारतावर आक्रमण करू.

या व्हिडिओला १८ डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या अनटोल्ड नावाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले होते, त्यावर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि पाकिस्तानी गोलंदाजावर जोरदार टीका केली आणि त्याला ISI एजंट म्हणून संबोधले.

काय आहे गजवा-ए-हिंद
हे पाकिस्तानच्या धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिलेले एक भविष्यवाणी आहे जे उर्दू भाषेत लिहिले आहे. त्यानुसार, एक दिवस मुस्लिम योद्धे हिंदूंशी लढा देतील, त्यानंतर मुस्लिम प्रथम काश्मीर आणि नंतर भारतीय उपखंड यावर विजय मिळवतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER