VIDEO: सामन्यादरम्यान संजू सॅमसनने हवेत उड्डाण घेऊन वाचवला षटकार, लोक म्हणाले ‘सुपरमॅन’

Sanju Samson - Video

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या टी -२० सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी संजू सॅमसनच्या (Sanju Samson) फिल्डिंग ने सर्वांना वेड लावले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तिसर्‍या टी -२० मध्ये संजू सॅमसनने चमत्कार केले. फलंदाजीत सॅमसनला जास्त कामगिरी करता आली नाही, त्याने ९ चेंडूत फक्त १० धावा केल्या. तथापि त्याने फिल्डिंग मध्ये धमाका केला. सामन्यादरम्यान सॅमसनने उत्तम फिल्डिंग केले होते, हे पाहून सोशल मीडियावर लोक वेडे झाले आहेत.

सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्याने एका चेंडूवर मोठा शॉट खेळला. तो शॉर्ट स्ट्रेट सिक्सरसाठी जात होता पण सॅमसन मध्ये आला आणि त्याने हवेत उडी मारली आणि झेल टिपला. त्याने सीमेबाहेर उडी मारली होती, अशा परिस्थितीत त्याने षटकार वाचविण्यासाठी चेंडूला मैदानात फेकले. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक झेल सोडत होते तेथे संजू सॅमसनने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून सर्वांची मने जिंकली. त्याने आपल्या संघासाठी सहा धावा वाचवल्या. सोशल मीडियावर या क्षेत्ररक्षणाचे खूप कौतुक होत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी -२० सामन्यात कांगारूंनी १२ धावांनी विजय मिळविला आहे. त्याचबरोबर भारताने तीन सामन्यांची टी -२० मालिका २-१ने जिंकली आहे. तिसर्‍या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने २० षटकांत पाच गडी गमावून १८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडिया लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER