ईशा कोप्पीकरचा वर्कआउट करतानाचा व्हीडियो व्हायरल

Video of Isha Koppikar doing a workout goes viral.jpg

‘खल्लास’ या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या आणि बॉलिवूडमध्ये खल्लास गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशा कोप्पीकरचा एक व्हीडियो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडियोत ईशा (Isha Koppikar) वर्कआऊट करताना दिसत असून ती वर्कआऊट करता करता चक्क एका गाण्यावर डांस करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ईशानेच हा व्हीडियो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ईशा कोप्पीकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते तसेच वेगवेगळ्या विषयावर आपली मतेही व्यक्त करते. काही दिवसांपूर्वी तिने कास्टिंग काउच आणि नेपोटिझमच्या मुद्द्यावरही आपली मते व्यक्त केली होती. आमच्यासारख्या बाहेरून येणाऱ्या कलाकारासाठी नेपोटिझम म्हणा वा फेव्हरिटिझम म्हणा खूप त्रासदायक असते. मात्र प्रत्येक स्टार किडला याचा फायदा होतो असेही नाही असेही ती म्हणाली होती. तर कास्टिंग काऊचबाबत बोलताना अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊचच्या माध्यमातून पुढे आल्या आहेत. मात्र ज्यांना त्यातून जायचे नाही त्या आपल्या निर्णयावर कायम राहू शकतात आणि यशही मिळवू शकतात असेही ती म्हणाली होती.

व्हिडियो शेअर करताना ईशाने म्हटले आहे की, हा सकाळच्या वेळी वर्कआउट करतानाचा व्हीडियो आहे. मनापासून डांस करणे हे सगळ्यात चांगला कार्डियो आहे. मी जेव्हा डांस करीत असते तेव्हा असे वाटते की सगळे जग माझे आहे. ईशा ज्या गाण्यावर डांस करीत आहे ते गाणे आहे ‘नचांगे सारी रात’. या गाण्यावर ईशा अगदी मनापासून नाचताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER