VIDEO: मोहम्मद सिराजच्या क्रीडा भावनेने जिंकले सर्वांचे मन, AUS मीडियाने केले त्याचे कौतुक

Mohammed Siraj - Cameron Green

ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरून ग्रीनच्या डोक्यावर बॉल लागताच तातडीने सिराजने आपली बॅट सोडत ग्रीनला बघायला गेला, ऑस्ट्रेलिया मीडियाने कौतुक केले.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) ऑस्ट्रेलिया A विरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात सर्वांचे मन जिंकले आहे. त्याचा उदारपणा पाहून ऑस्ट्रेलियन मीडिया त्याचे खूप कौतुक करीत आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना BCCI नेही एक चित्र शेअर केले आहे.

दुसर्‍या सराव सामन्यात जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) स्ट्रेट ड्राइव मारली आणि चेंडू सरळ गोलंदाज कॅमेरून ग्रीनच्या डोक्यावर लागला. नॉन स्ट्राइकर वर उभा असलेल्या सिराजने (मोहम्मद सिराज) त्वरित आपली बॅट सोडली आणि ग्रीनला बघायला पोहोचला. ग्रीनला ‘कनकशन’ च्या कारणामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियन A संघातील गुलाबी बॉलचा उर्वरित तीन दिवसांचा सराव सामन्याबाहेर केला आहे.

ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केले सिराजचे कौतुक

9न्यूज ऑस्ट्रेलियाने ट्विट केले, ‘भारतीय क्रिकेटपटू सिराज तरूण अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला डोक्याच्या दुखापतीनंतर त्वरित भेटायला गेला होता, त्यामुळे त्याच्या खेळण्याच्या भावनेचे कौतुक केले जात आहे.’

ABC च्या माइकल डोयलेने ट्विट केले, ‘सिराजने बॅट सोडून ग्रीनला पाहायला जाणे हे माझ्या या वेळेचा सर्वात प्रिय क्षण आहे.’

बीसीसीआयने यावर प्रतिक्रिया दिली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देखील एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ग्रीनला डोक्यावर लागल्या नंतर तो गुडघ्यावर उभा आहे आणि सिराज त्याच्यासोबत उभा आहे.

बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, ‘नॉन-स्ट्राइकर फलंदाज मोहम्मद सिराजने ताबडतोब कॅमेरून ग्रीन पाहिले, ज्याच्या डोक्यावर जसप्रीत बुमराहच्या स्ट्रेट ड्राइवने बॉल लागला होता.’

ग्रीनच्या सातव्या षटकात हा अपघात झाला. त्यावेळी बुमराह ४० धावांवर खेळत होता. ग्रीनला त्वरित मैदान सोडावं लागलं आणि नंतर सामन्यातून काढून टाकलं गेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER